HW News Marathi
Covid-19

स्थलांतरित मजुरांना घरी घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात, २३ जणांचा मृत्यू

औरैया | उत्तर प्रदेशातील औरैया येथे स्थलांतरीत मजुरांनी भरलेल्या ट्रकचा डीसीएमला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २३ मजुरांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले आहेत. एका ट्रकद्वारे हे मजूर राजस्थानहून आपपल्या घरी निघाले होते. जखमींना कानपूरच्या रुग्णालयात दाखल केले गेले आहे. ट्रकमधील सर्व मंजूर हे बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील होते, अशी माहिती एएनआयने वृत्त दिले आहे.

स्थलांतरित मंजुरांना घेऊ जाणाऱ्या ट्रकने आज (१६ मे) पहाटेच्या सुमारास रस्त्यावर उभ्या असलेल्या डीसीएमला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती मिळातच औरैया, एसपी सुनिती सिंह आणि अनेक पोलीस ठाण्यांचे पोलीस घटनास्थळी धाव घेतली. पोलीस मदत व बचावकार्यात सुरू आहे. या भीषण अपघात पाहात मृत्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळता वारांनुसार दुकाने सुरु राहणार

News Desk

माजी मंत्री सुरेश आमोणकर यांचे कोरोनामुळे निधन

News Desk

MPSCच्या परीक्षांची तारीख जाहीर!

News Desk