मुंबई | जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे वैष्णो देवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरीची झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर १४ जण जखमी झाले असून यातील ३ जण गंभीर आहे. या घटनेतील जखमी झालेल्यांना नारायण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नवीन वर्षाच्या स्वागत करण्यासाठी भाविकांनी वैष्णो देवी मंदिरात गर्दी केली होती. या घटनेची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून पंतप्रधानांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. या घटनेत मृत झालेल्या भाविकांच्या नातेवाईकांना सरकारकडून प्रत्येकी २ लाख तर जखमींना ५० हजार रुपय देण्याची घोषणा केली आहे.
वैष्णो देवी मंदिर भवन परिसरात शनिवारी मध्यरात्री २.४५ वाजताच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना झाल्याची माहिती मिळाली. या घटनेने संपूर्ण देश हादरून केला आहे. या घटनेनंतरही वैष्णो देवी यात्रा सुरू आहे. मंदिर परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीचे कारण अद्याप समजू शकले नाही. पंतप्रधानांनी ट्वीटमध्ये म्हटले, “वैष्णो देवी मंदिरात चेंगराचेंगरीमध्ये झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दु:ख झाले आहे. सर्व मृतांना श्रद्धांजली अर्पण करतो. आणि या घटनेबाबत जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा,केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांच्याशी चर्चा केली आहे.”
https://twitter.com/narendramodi/status/1477090989151973376?s=२०
“मी ताबडतोब कटरा येथील माता वैष्णो देवी घटनेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रवाना होत आहे. या घटनेसंदर्भात प्रशासनाशी चर्चा करण्यात येणार असून पंतप्रधानांना परत रिपोर्ट देणार आहे,” असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्वीट करत म्हटले आहे. कोरोनाचे संकट अजूनही गेलेले नाही. या कोरोनासंदर्भात देवस्थळांना गाइडलाईन देण्यात आली असून सुद्धा वैष्णो देवी मंदिरात मोठी गर्दी झाली. या मंदिरात मोठ्या संख्येने तरुण मंडळी उपस्थित होती. त्यावेळी काही कारणावरून वादविवाद झाला. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविक विशेष करून तरुण पिढी समजून घेत नाही, या ठिकाणी कोरोना नियम पुन्हा लागू करण्यात आली. असून एक हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आले आहे, अशी माहिती सिंहनी सांगितले.
https://twitter.com/DrJitendraSingh/status/1477105495886360576?s=२०
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.