नवी दिल्ली | केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला ३७० कल रद्द करत विभाजन करण्याचा प्रस्ताव आज (५ ऑगस्ट) राज्यसभेत मांडला होता.या विधेयकाला राज्यसभेत १२५ विरुद्ध ६१ मतांनी मंजूर करण्यात आले आहे. तांत्रिक कारणास्तव मशीनद्वारे मतदान रद्द, चिठ्ठीद्वारे राज्यसभेत मतदान प्रक्रिया सुरू केले.
The Jammu & Kashmir Reorganisation Bill, 2019 passed by Rajya Sabha pic.twitter.com/jixNAn3x0y
— ANI (@ANI) August 5, 2019
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. जम्मू-काश्मीरचेकलम ३७० रद्द करण्याच्या प्रस्तावावर भाजप व्होटबँकेचे, जातीयवादाचे राजकारण करत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली आहे. यानंतर त्यांनी मतदान घेण्याचा प्रस्ताव मांडला. यावर राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी मतदान घेतले.
HM Amit Shah in Rajya Sabha: We don’t believe in politics of religion, what votebank politics? Only Muslims live in Kashmir? What do you want to say? Muslims, Hindus,Sikhs,Jains, Buddhists all live there. If 370 is good it is good for all, if it is bad then it is bad for all. pic.twitter.com/HeBVUm7kti
— ANI (@ANI) August 5, 2019
परंतु काश्मीर फक्त मुस्लिमच राहतात का? तुम्हाला काय म्हणायचे आहे. काश्मीरमध्ये मुस्लिम, हिंदू, शीख, जैन, बुद्धिस्टही राहतात. जर ३७० कलम चांगले असेल तर ते सर्वांसाठी चांगले आणि जर वाईट असेल तर सर्वांसाठी वाईटच असणार असल्याचे शहा यांनी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.