HW News Marathi
मनोरंजन

कुंभमेळ्यात आगीचे सत्र कायम, बिहारचे राज्यपाल बचावले

प्रयागराज | उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये आग लागल्याने सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. बिहारचे राज्यपाल लालजी टंडन वास्तव्यास असलेल्या कॅम्पमध्ये मंगळवारी (१२ फेब्रुवारी) मध्यरात्री आग लागली होती. या आगीत सुदैवाने लालजी टंडन थोडक्यात बचावले असल्याची माहिती मिळाले आहे. परंतु टंडन त्यांचे वास्तव्य असलेला टेंट तसेच इतर वस्तू जळून खाक झाल्या होत्या. या प्रकारानंतर राज्यपाल लालजी टंडन यांना कुंभ मेळ्यातील सर्किट हाऊसमध्ये हलवण्यात आले आहे.

बिहारचे राज्यपाल लालजी टंडन हे कुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रयागराजमध्ये गेले आहेत. आगीची घटना घडली तेव्हा राज्यपाल महोदय झोपलेले होते. त्यांना सुखरूपरीत्या बाहेर काढण्यात आले. मात्र त्यांच्याजवळील मोबाइल, चष्मा, घड्याळ आदी चीज वस्तू या आगीत जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे.

ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये याआधी देखील आगीच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नाथ संप्रदायाच्या शिबीर क्षेत्रात आग लागली होती. त्यात दोन टेंट जळाले होते. त्याआधी १५ जानेवारी रोजी दिगंबर आखाड्याच्या टेंटमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली होती. त्यात १० टेंट जळाले होते. त्याशिवाय कुंभमेळ्यामध्ये किरकोळ आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नरेंद्र मोदींच्या संघ विचारधारेवर महेश भट्ट यांची टीका

News Desk

Gandhi Jayanti : खादी व ग्रामोद्योग आयोगाकडून ‘खादी फेस्ट २०१८’चे आयोजन

Gauri Tilekar

चॉकलेट गिफ्टवाली दिवाळी

swarit