HW Marathi
देश / विदेश

आज रात्री १०.३० वाजता जेट एअरवेजचे शेवटचे उड्डाण

मुंबई | जेट एअरवेजचे शेवटचे विमान आज (१७ एप्रिल) १०:३० वाजता उड्डाण घेणार आहे. रात्री १२ वाजल्यापासूनची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. बँकांडून ४०० कोटींची मदत न मिळाल्यामुळे जेट एअरवेज बंद होण्याच्या वाटेवर आली आहे. जेट एअरवेजच्या वतीने उद्या (१७ एप्रिल) पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी जेट एअरवेज कंपनीचे चेअरमन नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता बोर्ड संचालक मंडळातून राजीनामा दिला होता. जेट एअरवेज गेल्या काही दिवसांपासून कर्जबाजारीपणामुळे दिवाळखोरीत निघाली. जेट एअरवेज जी विमाने भाड्यावर घेतली होती. त्यांची देणी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. गोयल यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या हिस्स्यातील ५१ टक्के शेअर जेट एअरलाईन्सला मिळू शकतात. जेट एअरवेजवप सध्या २६ बँकांचे ८ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.

 

Related posts

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या बीएसएफ जवानाला अटक

Gauri Tilekar

पंतप्रधानांनी मराठीतून दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

News Desk

भारत दहशतवादाने त्रस्त, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल प्रसिद्ध

Gauri Tilekar