श्रीनगर | पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालायाने भारतीय लष्कराच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असणाऱ्या भारतीय लष्करातील जवानांना विमान प्रवासाठी मंजुरी दिली आहे.
MHA: The decision will immediately benefit approximately 780,000 personnel of CAPFs in the ranks of Constable, Head Constable & ASI who were otherwise not eligible earlier. This includes journey on duty and journey on leave, i.e; while going on leave from J&K to home and return. https://t.co/iYyd1qOv4T
— ANI (@ANI) February 21, 2019
या गृहमंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली, श्रीनगर-जम्मू व जम्मू-श्रीनगर दरम्यान विमानानं प्रवास करता येणार आहे. केंद्रीय सशस्त्र अर्धसैनिक दलांतील बीएसएफ, एसएसबी, सीआरपीएफमधील सर्व कर्मचाऱ्यांना विमानाने प्रवास करता येईल. गृहमंत्रालायाच्या निर्णयामुळे केंद्रीय सशस्त्र अर्धसैनिक दलांच्या तब्बल ७ लाख ८० हजार जवानांना याचा फायदा होणार आहे.
MHA: In J&K Sector, it may be recalled that Air Courier Service for CAPFs jawans was approved for the Jammu-Srinagar-Jammu sector.
Subsequently, the Service was extended to cover 1) Delhi-Jammu, 2) Jammu-Srinagar, 3) Srinagar-Jammu and 3) Jammu-Delhi sector in Dec 2017.— ANI (@ANI) February 21, 2019
केंद्रीय गृहमंत्रालयाचा हा निर्णय तात्काळ लागू होणार आहे. कर्तव्यावर असताना. तसेच सुट्टीवर जाताना वा पुन्हा रुजू होताना श्रीनगरहून येण्या-जाण्यासाठी ही सुविधा मिळेल. यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असेल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.