HW News Marathi
Covid-19

जगभरातील कोरोना बाधितांची संख्या ७२ लाखांवर पोहोचली

मुंबई | जगभरात कोरोनाच विषाणूचा फैलाव झाला आहे. गेल्या २४ तासांत १ लाख ७ हजार नवीन कोरोना रुग्ण अढळून आले. तर ३ हजार १५७ ने कोरोनाच्या मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. जभरात आतापर्यंत ७१ लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४ लाख ८ हजार लोकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमाले आहे, अशी माहिती वर्ल्डोमीटरची आकडेवारी सांगते.

जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेमध्ये आतापर्यंत २० लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेपाठोपाठ ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. ब्राझीलमध्ये गेल्या २४ तासात १८,९२५ नवे रुग्ण समोर आले आणि ८१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेमध्ये गेल्या २४ तासांमध्ये १९०३७ नवी रुग्णांची नोंद झाली असून ५८६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना रुग्णांची अमेरिकेत २,०२६,४८६ रुग्ण तर मृत्यू ११३,०५५ झाले आहे. ब्राझील कोरोनाग्रस्तांची संख्या ७१०,८८७ तर मृत्यू ३७,३१२ झाले आहे. रूसमध्ये रुग्ण ४७६,६५८ असून ५,९७१ लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत २८८,७९७ तर २७,१३६ जणांचा कोरोनामुळे प्राण गामावले आहे. यूकेमध्ये २८७,३९९ रुग्णांची संख्या आहे. तर आतापर्यंत ४०,५९७ जणांचा मृत्यू झाला आहे.

इटलीत २३५, २७८ कोरोना बाधितांची संख्या आहे तर ३३,९६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पेरूमध्ये १९९,६९६ जणांना कोरोनाची बाधा झाली असून ५,५७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जर्मनीमध्ये १८६,२०५ जणांना कोरोनाचा बाधा झाली तर ८,७८३ कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच इराणमध्ये १७३,८३२ कोरोनाग्रस्तांची संख्या आहे. तर आतापर्यंत ८,३५१ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यास राष्ट्रवादीची नकारात्मक भूमिका 

News Desk

‘फक्त भो भो करू नका ,आरोप सिद्ध करा !’ सिद्ध झाले तर राजकारणातून निवृत्त होईन…महापौरांचा सौमय्यांवर पलटवार …

News Desk

धारावीत २५ नवे कोरोनाबाधित, एकूण आकडा १३७८ वर

News Desk