HW News Marathi
Covid-19

जगभरात कोरोनाबाधितांची संख्या ७८ लाखांहून अधिक, तर अमेरिकेत मृतांची संख्या एक लाखांवर

मुंबई | जभरात गेल्या २४ तासांत २ लाख ७६ हजार नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर जगभरात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ७८ लाखांहून अधिक झाली आहे. तसेच आतापर्यंत जगात कोरोनामुळे मृत्यू पालेल्या लोकांची ४ लाख ३२ हजारांवर पोहोचली आहे. तर जगभरात ४० लाख ३६ हजार रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती वर्ल्डोमीटरने दिली आहे.

कोरोनामुळे अमेरिकेला सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेत २,१४२,२२४ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर ११७,५२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगात अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. ब्राझीलमध्ये ८५०,७९६ कोरोनाग्रस्तांची संख्या आहे. तर ब्राझीलमध्ये ४२, ७९१ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. युकेत २९४,३७५ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४१,६६२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इटलीत ३४,३०१ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर इटलीत २३६,६५१ कोरोनाबाधितांची संख्या आहे.

जगात भारत कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये चौथ्या स्थानावर असल्याची माहिती वर्ल्डोमीटरने दिली आहे. देशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक ११ हजार ९२९ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या २४ तासांत ३११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सलग चौथ्या दिवशी ३०० पेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तसेच देशात २४ तासात ८ हजार ५० रुग्ण बरे झाले आहे. देशात आता कोरोना बाधितांची रुग्णांची संख्या संख्या ३ लाख २० हजार ९२२ वर पोहोचली आहे. सध्या देशात १ लाख ४९ हजार ३४८ अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत १ लाख ६२ हजार ३२६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित देशमुख यांनी या कारणासाठी घेतली राज्यपालांची भेट

News Desk

महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे !  मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

News Desk

दिलासादायक : ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून कोविड-१९ च्या लसीबाबत एक आनंदाची बातमी

News Desk