मुंबई | संपूर्ण जग हे सध्या कोरोनाविरुद्ध लढत आहे. जगभरात ४६ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत जगभरात ३०८,६४२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत ९९ हजार ११६ नवीन कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली तर, ५, ०५५० लोकांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीने दिली आहे. मात्र, जगभरात आतापर्यंत १७ लाखांहून अधिक लोकांना कोरोनावर मात केली आहे.
जगात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव हा अमेरिकेत झाला आहे. अमेरिकेत १,४८४,००४ जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर ८८, ४८५ लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. तर अमेरिकेपाठोपाठ यूकेमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहे. यूकेत ३३,९९८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तिथे कोरोनाबाधितांची संख्या २३६,७११ इतकी आहे. स्पेनमध्ये २७४,३६७ लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. तर २७,४५९ लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत ३१, ६१० मृत्यू झाला. तर २२३,८८५ इक्या लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.
जगभरात कोरोनाने सर्वाधिक प्रवाभवित झालेले देश
- अमेरिका – १,४८४, ००४ मृत्यू- ८८,४८५
- स्पेन – २७४,३६७ मृत्यू- २७,४५९
- रशिया – २६२, ८४३ मृत्यू- २,४१८
- यूके – २३६,७११ मृत्यू- ३३,९९८
- इटली – २२३, ८८५ मृत्यू- ३१,६१०
- ब्राजील – २१८.२२३ मृत्यू- १४,८१७
- फ्रांस – १७९,५०६ मृत्यू- २७,५२९
- जर्मनी – १७५,६९९ मृत्यू- ८,००१
- टर्की – १४६,४५७ मृत्यू- ४,०५५
- इरान – ११६,६३५ मृत्यू- ६,९०२
- पेरू -८४,४९५ मृत्यू- २,३९२
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.