मुंबई | जगभरात गेल्या २४ तासात ७९ हजार ८७५ नवीन कोरोना रुणांची नोंद झाली असून ३ हजार ५१० लोकांनी आपले प्राण गमावले आहे. जगभरात आतापर्यंत ४२ लाखा लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर २ लाख ८३ हजार ७३४ वर मृतांचा आकडा पोहोचला आहे, अशी माहिती वर्ल्डोमीटरने दिली आहे. यात जगाला दिलासा देणार बाब म्हणजे १४ लाख ९० हजार ४४४ रुग्ण बरे झाले आहेत.
अमेरिकेत १, ३६७,६३८ लोकांना कोरोनाची लागण झाली असून ८०, ७८७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे अमेरिका आणि यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यूची संख्याची नोंद झाली आहे. स्पेनमध्ये २६,२ृ६२१ लोकांनी आपले प्राण गमावले आहे. तर २६४, ६६३ लोकांना कोरोनाची बाधा झाला आहे. जगभरात अमेरिका, स्पेननंतर इटली हे तिसरे राष्ट्र आहे. ज्यामध्ये कोरोनाचा प्रभाव दिसून येत आहे. इटलीमध्ये आतापर्यंत २१९,०७० लोकांना कोरोनाची लागण झाली असून ३०, ५६० जणांचा मृत्यू झाला आहे.
जगभरातील कोरोना बाधितांची संख्या
- अमेरिका – १,३६७,६३८ मृत्यू- ८०,७८७
- स्पेन – २६४,६६३ मृत्यू – २६,६२१
- यूके -२१९,१८३ मृत्यू- ३१,८५५
- इटली – २१९,०७० मृत्यू- ३०.५६०
- रशिया – २०९,६८८ मृत्यू- १,९१५
- फ्रांस – १७६,९७० मृत्यू- २६,३८०
- जर्मनी – १७१,८७९ मृत्यू- ७,५६९
- ब्राझिल – १६२,६९९ मृत्यू- ११,१२३
- टर्की – १३८,६५७ मृत्यू- ३,७८६
- इरान – १०७,६०३ मृत्यू- ६,६४०
- चीन – ८२,९०१ मृत्यू- ४,६३३
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.