HW News Marathi
देश / विदेश

दरमाह तब्बल चार लाखांची पोटगी देण्याचे आदेश

नवी दिल्ली – एक दोन नव्हेत, तर तब्बल चार लाख रुपये पत्नीला दरमाह पोटगी म्हणून देण्याचे तसेच त्यात १५ टक्के वार्षिक वाढ असण्याचे आदेश दिल्ली न्यायालयाने कोट्याधीश पतीला दिला आहे. पत्नी आणि अल्पवयीन मुलीला वा-यावर सोडल्याप्रकरणी न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

ही व्यक्ती अतीश्रीमंत कॅटेगरीमध्ये येत असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. त्याची सुमारे एक हजार कोटींची उलाढाल असल्याचंही सांगण्यात आलं होतं. न्यायालयाने या गोष्टीची दखल घेत इतकी मोठी पोटगी देण्याचा आदेश दिला आहे.

न्यायाधीश नरोत्तम कौशल यांनी हा आदेश दिला आहे. पतीच्या व्यवसायात होत असलेली वाढ आणि सलग दोन आर्थिक वर्षांमध्ये वाढलेलं इन्कम यांची नोंद घेत न्यायाधीश नरोत्तम कौशल यांनी पीडित पत्नी आणि मुलीचा सांभाळ करण्यासाठी देण्यात येणा-या पोटगीत दरवर्षी 15 टक्के वाढ करण्याचाही आदेश दिला आहे. पतीच्या आर्थिक स्थितीकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही, असंही न्यायालयाने या वेळी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केल्या ‘या’ १२ घोषणा

News Desk

बिहारमध्ये कोरोना संपला का? तसं असेल तर केंद्राने जाहीर करावं, राऊतांचा खरमरीत टोला

News Desk

रोड शोदरम्यान पुन्हा एकदा केजरीवाल यांच्या श्रीमुखात भडकावली

News Desk