HW News Marathi
देश / विदेश

गाढ झोपलेल्या तरुणाला मृत समजून हलवले रुग्णालयात

रेल्वे प्रवास करताना अनेक चित्रविचित्र अनुभव येतात. मुंबई ते वाराणसी रेल्वेत घडलेला एक प्रसंग प्रवाशांच्या अंगावर शहारे आणणारा होता. मुंबईतील कल्याण रेल्वेस्थानकावर रेल्वेत चढलेला तरुण अचानक वरच्या बर्थवरून खाली पडला. पडल्यानंतर त्याच्या हृदयाचे ठोेके बंद झाले. या डब्यातील प्रवाशांनी मृत झाला असे समजून त्याच्या अंगावर चादर टाकली. बहुतांश प्रवासी तो डबा सोडून दुसºया डब्यात गेले. प्रवासादरम्यान आठ तासांनंतर एका प्रवाशाने रेल्वेच्या हेल्प लाइनशी संपर्क साधून महानगरी एक्स्प्रेसमध्ये जनरल डब्यात एक मृतदेह असल्याची माहिती दिली. मध्य प्रदेशातील ब-हाणपूर रेल्वेस्थानकावर रेल्वे थांबली.

तेथे रेल्वे पोलिसांनी या डब्यात प्रवेश केला. या जवानांनी या तरुणास मृत समजून पांढºया कपड्यात त्याचा मृतदेह गुंडाळला व तो मृतदेह रेल्वेतून खाली आणला. खाली आणताच तो तरुण अचानक उठून उभा राहिला. त्या तरुणाला स्वत:चे नाव सांगता येईना. काही मिनिटे शुद्धीत राहिल्यानंतर तो पुन्हा बेशुद्ध पडला. रेल्वे पोलिसांनी त्या तरुणास उपचारासाठी रुग्णालयात नेले. त्यादरम्यान ठाकूर यांना या तरुणाच्या हृदयाचे ठोके चालू असल्याची जाणीव झाली. त्यांनी तोंडावरून कपडा बाजूला केला व त्याच्या चेहºयावर थंड पाण्याचा शिडकावा केला. पाणी शिंपडताच त्या तरुणाची पुन्हा हालचाल सुरू झाली.त्या तरुणाने स्वत:चे नाव सुरेश मंगरूक पटेल असून आपण औषध घेऊन झोपलो होतो. त्यानंतर शुद्धीवर नव्हतो, असे पोलिसांना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यंदाच्या अर्थसंकल्पातील ‘या’ वस्तू महाग आणि स्वस्त

swarit

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा १ जवान शहीद, १ जखमी

News Desk

भाजप सरकारला सावरकरांचा सन्मान करण्यासाठी कोणी रोखले होते ?, सामनातून मोदींना सवाल

News Desk