नवी दिल्ली | पश्चिम बंगालममता बॅनर्जी आणि सीबीआयमधला वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज (५ फेब्रुवारी) झालेल्या सीबीआय प्रकरणाच्या सुनावणी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना नोटीस बजावले असून सीबीआला सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहे. राजीव कुमार यांना अटक करण्यात येऊ नये असंही या आदेशांमध्ये म्हटलं आहे. त्यानुसार राजीव कुमार यांनी २० फेब्रुवारी रोजी हजर होण्याचे आदेश देण्यात सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
Next day of hearing is February 20. https://t.co/VUzsg9P9XN
— ANI (@ANI) February 5, 2019
सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश गोगोई यांनी कोलकात्याच्या पोलीस आयुक्तांना शिलाँगमध्ये सीबीआयच्या समोर हजर राहण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने ममता बॅनर्जीला मोठा धक्का बसला असल्याचे म्हटले जात आहे. सीबीआयने काल (४ फेब्रुवारी) कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या अटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती.
The Police Commissioner of Kolkata Rajeev Kumar will appear before the Central Bureau of Investigation (CBI) in Shillong, Meghalaya as a neutral place. https://t.co/VUzsg9P9XN
— ANI (@ANI) February 5, 2019
शारदा घोटाळ्यात एसआयटीला लॅपटॉप आणि मोबाईलसारखे सबळ पुरावे सापडले आहेत. राजीव कुमार यांनी शारदा घोटाळ्यातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राजीव कुमार यांना सीबीआयच्या चौकशीला सहकार्य करण्यास सांगितले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.