HW News Marathi
देश / विदेश

घरगुती गॅस सिलिंडच्या किंमती आजपासून वाढ

नवी दिल्ली | घरगुती गॅस सिलिंडच्या किंमती आजपासून (१ ऑक्टोबर) वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सलग दुसऱ्या महिन्यात वाढ झाल्याने गृहणींचे बजेट आता कोलमडले आहे. तर देशातील इतर शहरात विनाअनुदानित गॅस सिलिंडर १५ रुपयांनी महागला आहे.

दिल्लीत देखील विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्यासाठी ६०५ रुपये मोजावे लागणार आहेत. तर कोलकात्याममध्ये सिलिंडरची किंमत ६३० रुपये द्यावे लागणार आहे. तसेच मुंबई विनाअनुदानित गॅस सिलिंडरचे ५७४ रुपये तर चेन्नईमध्ये विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत ६२० रुपये झाले आहेत. तसेच दिल्लीत १९ किलोग्राम सिलिंडरची किंमत १०८५ रुपये झाली आहे. कोलकात्यामध्ये देखील ११३९. ५० रुपये तर मुंबई १०३२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये देखील ११९९ रुपये दिले आहे.

सप्टेंबर महिन्यातील गॅस सिलिंडरचे दर

सप्टेंबरमध्ये दिल्लीत १४.२ किलो विनाअनुदानित सिलिंडर ५९० रुपये होता. कोलकात्यात याच सिलिंडरचा दर ६१६.५० रुपये होता. तर मुंबई आणि चेन्नईत १४.२ किलो विनाअनुदानित सिलिंडरचा ५६२ आणि ६०६.५० रुपये होता. तसेच १९ किलोग्रामच्या दिल्लीतल्या सिलिंडरची किंमत १०५४.५० रुपये होती. कोलकात्यात गेल्या महिन्यात १११४.५० रुपये, मुंबईत १००८.५० रुपये आणि चेन्नईत ११७४.५० रुपये दर होता.

ऑगस्ट महिन्यात विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ६२.५० रुपयांची कपात करण्यात आली होती. ऑगस्टमध्ये या गॅस सिलिंडरची किंमत ५७४ रुपये ५० पैसे इतकी होती. तर जुलै महिन्यात १४.२ किलोच्या सिलिंडरसाठी ६३७ रुपये मोजावे लागत होते. कोलकातामध्ये विनाअनुदानित सिलिंडरची किंमत ६०१ रुपये, तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गॅस सिलिंडरचे दर ५४६.५० रुपये झाले होते. तर चेन्नईमध्ये सिलिंडरचे दर ५९०.५० रुपये होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टोक्यो पॅराऑलिंपिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या भाविनाबेन पटेल यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन!

News Desk

भारताला जसे मित्रत्व निभावता येते, तसे डोळ्यात डोळे घालून योग्य उत्तरही देता येते !

News Desk

दहशतवादी तळ निर्माण होत राहील तोपर्यंत आम्ही कारवाई करत राहणार | भारतीय लष्कर

News Desk