HW Marathi
देश / विदेश राजकारण

राजस्थानमध्ये आरक्षणासाठी गुर्जर समाजाचा आक्रमक पवित्रा

नवी दिल्ली | राजस्थानमधील गुर्जर समाजाने राज्यात नोकरी आणि शिक्षणात ५ टक्के आरक्षण देण्याची मागणी केली आहे. आरक्षणाच्या मागणी करण्यासाठी गुर्जर समाजाने आज (१० फेब्रुवारी)  पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत आंदोलन पुकारले आहे. परंतु याआंदोलनाला हिंसक वळण घेतले आहे. आंदोलकांनी दरम्यान धोलपूरमध्ये दगडफेक आणि गोळीबार देखील झाला. यानंतर आंदोलनांनी तीन गाड्यांची जाळपोळ केली आहे.

धोलपूरच्या दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गाला जाम केल्यानंतर जमावाने पोलिसांवर दगडफेक केली आहे. आंदोलकांनी पोलिसांच्या दोन जीप आणि एक बस पेटवून दिल्यानंतर दगडफेक सुद्धा केली. या दगडफेकीत चार जवान जखमी झाले. पोलिसांनी जमावाला नियंत्रित करण्यासाठी अश्रु धुराच्या नळकांड्या फोडल्या. काही वेळानंतर महामार्गावरील वाहतुक सुरळीत झाली.  त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता.

आंदोलकांनी दुपारी धोलपूर शहरात आरक्षणासाठी एक बैठक घेतली. त्यानंतर आंदोलकांनी दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला. या दरम्यान पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. जमावानेही पोलिसांच्या अंगावर दगड फेकण्यास सुरुवता केले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. पोलिसांनी गोळीबार केल्यानंतर आंदोलक चंबलकडे पळाले. दगडफेक आणि गोळीबारानंतर मोठ्या प्रमाणात घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. गुर्जर समाजाचे आंदोलक सवाई माधोपूरमध्ये रेल्वेच्या रुळावर उतरले होते. त्यामुळे भारतीय रेल्वेने वांद्रे टर्मिनस आणि सवाई माधोपूरपर्यंत स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला होता.

Related posts

अंतराळात भारताचे सर्जिकल स्ट्राइक, ‘मिशन शक्ती’ला मोठे यश

News Desk

…फक्त 10 वर्षांसाठी आरक्षण हवं होतं !

News Desk

मोदींना स्किझोफ्रेनिया झालाय का ?, राहुल गांधींचा सवाल

News Desk