HW News Marathi
देश / विदेश

देशातील पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका ‘INS विक्रांत’ नौदलात सामील

मुंबई |  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आयएनएस विक्रांतचा (INS Vikrant) लोकापर्ण सोहळा पार पडला आहे. देशातील पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या (Indian Navy) ताफ्यात सामील झाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज (2 सप्टेंबर) केरळमधील कोची येथे आयएनएस विक्रांतचा लोकार्पण सोहळा पार पडला असून यानंतर आयएनएस विक्रांत ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील करण्यात आली.

स्वदेशी बनावटीची आयएनएस विक्रांत ही पहिली युद्धनौका आहे. या विमावाहू युद्धनौका भारतीय नौदलाच्या स्वत:च्या संस्थेच्या वॉरशिप ब्युरोने डिझाइन केली आहे. ही युद्धनौका बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये युद्धनौका तयार केली आहे.

अशी तयार झाली आयएनएस विक्रांत

आयएनएस विक्रांतमध्ये 76 टक्के देशात उपलब्ध असलेल्या संसाधानांन वापरून बनविली असून विक्रांतच्या बांधणीसाठी लागणारा स्टील भारतीय पोलाद प्राधिकरणाने तयार केले आहे. हा पोलाद तयार करण्यासाठी भारतीय नौदल, संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशालेच्या मदतीने तयार केली आहे.

या युद्धवनौकेत स्टील 2500 किमीची इलेक्ट्रिक केबल, 150 किमीचे पाइप आणि 2 हजार व्हॉल्व्ह यांचा समावेश करण्यात आला आहे. या निर्मितीमध्ये भारत इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BEL), भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL), किर्लोस्कर, L&T (L&T), Keltron, GRSE, Wartsila India आणि इतर अन्य उद्योजकांचा मोठा वाटा आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

येडियुरप्पा २४ तासांचे मुख्यमंत्री?

News Desk

कुलभूषण जाधवचा दुसरा व्हिडीओ पाककडून जारी

News Desk

जेव्हा उपसभापतीच निलंबित खासदारांसाठी चहा घेऊन येतात…

News Desk