HW News Marathi
देश / विदेश

शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे चिन्हांचा प्रस्ताव सादर

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेची संवाद साधताना पक्षाची तीन नाव आणि चिन्ह दिले आहे. ठाकरे गटाच्या चिन्हावर शिंदे गटानेही निवडणूक आयोगाकडे (Election Commission) आज (10 ऑक्टोबर) दावा केला आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे तीन चिन्ह दिले आहे. यात ठाकरे गटाने तिशूळ, मशाल आणि उगवता सूर्य पक्षाचे चिन्ह दिले आहे. तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधन कार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तीन नावे दिली आहेत. आता निवडणूक आयोक काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

दरम्यान, शिंदे गटाने चिन्हांसाठी दिलेल्या तीन पर्यायांमध्ये दोन चिन्ह हे ठाकरेंची कॉपी केले आहेत. ठाकरे गटाने उगवता सूर्य आणि त्रिशूळ हे दोन चिन्ह दिले आहे. तर शिंदे गटाने सुद्धा उगवता सूर्य आणि त्रिशूळ दिले आहे. ठाकरे गटाने तिसरे चिन्ह मशाल असून शिंदे गटाचे गदा दिली आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही बाजूने दोन चिन्हांवर दावा केल्याने ते चिन्ह बाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे दोन्ही चिन्ह कोणालाच मिळणार नाही.

 

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी 7 ऑक्टोबरपासून ते 15 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज भरण्याची तारीख आहे. तर 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला निकाल हाती येणार आहे. निवडणूक आयोग आज ठाकरे आणि शिंदे गटाला पक्षाचे नावे नाव आणि चिन्ह देणार आहे.

 

40 डोक्याच्या रावनाने प्रभू श्री रामचंद्रचे धनुष्यबाणही गोठावले – उद्धव ठाकरे

 

उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शिंदे गटावर टीका करताना म्हणाले, “मला आज तुमच्यासमोर येण्याचे कारण काय?, निवडणूक आयोगाने काल जो निर्णय घेतला. शिवसेनेचे नाव गोठवले. शिवसेनेचे नाव गोठवले, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह हे गोठवले. म्हणजे आज देखील ते निवडणूक चिन्ह धनुष्यबाण ज्याची शिवसेना प्रमुख मनोभावे पुजा करत होते. त्याची पुजा आजही देवाऱ्यात होते.  तो धनुष्यबाण आजही आहे. पण 40 डोक्याच्या रावनाने प्रभू श्री रामचंद्रचे धनुष्यबाणही गोठावले. ”

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सलमान खानचे ‘चित्रपट’ आणि ‘टीव्ही शो’ भविष्य अंधारात

News Desk

‘फरार’ विजय माल्ल्या

News Desk

कोरोनापासून बचाव करण्यासाठी लक्ष्मण रेषा पाळा, पंतप्रधानांचे भारतीयांना आवाहन

swarit