नवी दिल्ली | लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही सुरक्षा सुधारणा विधेयक (एसपीजी विधेयक) मंजूर झाले आहे. या विधेयकाच्या मतमोजणीच्या वेळी काँग्रेस नेत्यांचा सभात्याग करत त्यांनी एसपीजी विधेयकावर नाराजी व्यक्त केली आहे. या एसपीजी विधेयकानुसार माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांना ही सुरक्षा मिळणार नाही. मात्र, आता एसपीजी सुरक्षा ही केवळ विद्यमान पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांनाच मिळणार आहे.
The Special Protection Group (Amendment) Bill, 2019 passed by Rajya Sabha. Congress had staged walkout from the House. pic.twitter.com/751OzjChiM
— ANI (@ANI) December 3, 2019
एसपीजी हे विधेयक आज (२ डिसेंबर) राज्यसभेत मांडण्यात आले. हे विधेयक सभागृहात मांडताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गांधी कुटुंबावर हल्लाबोल केला. यावेळी शहा म्हणाले की, गांधी कुटुंबीयांनाच एसपीजीची सुरक्षा का पाहिजे?, असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच शहा पुढे म्हटले की, गांधी कुटुंबीयांची सुरक्षा हटवण्यात आली नसून ती बदलण्यात आली आहे. एसपीजी सुरक्षा ही एखाद्या कुटुंबासाठी असू शकत नाही. एसपीजी सुरक्षा म्हणजे स्टेट्स सिम्बॉल नाही, असे म्हणत गांधी कुटुंबावर शहांनी निशाणा साधला.
Home Minister Amit Shah in Rajya Sabha: Security cannot be made a status symbol. Why demand only SPG? SPG cover is meant for only the 'head of the state', we cannot be giving it to everyone. We don't oppose one family, we are against dynasty politics. https://t.co/Frb1HH8rqo
— ANI (@ANI) December 3, 2019
गांधी कुटुंबीयांना एसपीजी काढून घेतली असून संरक्षणमंत्री, गृहमंत्री आणि उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपतींना देण्यात येणारी सुरक्षा त्यांना देण्यात येणार आहे. कम्युनिस्ट पार्टीला राजकीय बदलावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. केरळमध्ये भाजप आणि आरएसएसच्या १२०हून अधिक कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. हा फक्त राजकीय बदलच आहे, असे शहा सभागृहात म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.