HW News Marathi
देश / विदेश

महाराष्ट्रातील सत्तांतरावर ‘या’ तारखेला सुनावणी होणार

मुंबई | महाराष्ट्रातील सत्तांतरावर 13 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. कारण 17 डिसेंबर ते 1 जानेवारी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) हिवाळी सुट्ट्या असणार आहे. नवीन वर्षात म्हणजे जानेवारी महिन्यात मुख्य युक्तीवाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यायालयात 29 नोव्हेंबर महाराष्ट्रातील सत्तांतरणावर सुनावणी होणार होती. घटनापीठा समोर राज्यातील सत्तांतरावर कामकाज सुरू आहे. परंतु, हे अद्याप मुख्य युक्तीवाद सुरु झालेला नाही.

दरम्यान, यापूर्वी न्यायालयातील पाच घटनापीठासमोर 29 नोव्हेंबर झालेल्या सुनावणीत होणार होती. त्यातील न्यायमूर्ती कृष्ण मुरारी हे आजारी असल्यामुळे ते सुनावणीला उपस्थित राहू शकले नाही. यानंतर राज्यातील सत्तांतरावर कधी सुनावणी होणार होती. याकडे सर्वांचे लक्ष लागेल होते. या प्रकरण घटनात्मक पेच असल्यामुळे उशीर व्हायला नको. यामुळे न्यायालयाने म्हटले की, काही निर्देशांसाठी 13 डिसेंबरला आम्ही हे प्रकरण ऐकू. यामुळे राज्यातील सत्तांतराचे प्रकरण मंगळवारी (13 डिसेंबर) न्यायालयाच्या कामकाजात लावण्यात आलेले आहे. परंतु, या सुनावणीदरम्यान, मोठी घडमोड होण्याची शक्ता कमी असल्याची माहिती एबीपी माझाने दिली आहे. यामुळे राज्यातील सत्तांतराचा मुख्य युक्तीवात हा जानेवारी महिन्याच्या 10 तारखेपासून होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या 16 आमदार अपात्रतेच्या याचिकेवर न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनापीठापुढे ही सुनावणी होणार होती. यात न्या.एम आर शहा,  न्या. कृष्ण मुरारी, न्या.हिमाकोहली आणि  न्या. पी नरसिंहा या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर राज्यातील सत्तांतरावर सुनावणी होणार आहे.

संबंधित बातम्या

राज्यातील सत्तांतरावर आज होणारी सुनावणी ‘या’ कारणामुळे लांबणीवर

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मीरा कुमार यांना काँग्रेसकडून राष्ट्रपतीपदाची उमेदवारी

News Desk

रामदास आठवले यांच्याकडून केरळला मदत

News Desk

गंगा नदीत नाव उलटली २१ जणांचा मृत्यू तर अनेकजण बेपत्ता

News Desk