नवी दिल्ली | गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या अयोध्या रामजन्मभूमी प्रकरणाचा आज (९ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात निकाल लागणार आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरून ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये मोदी म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कुणाची जीत अथवा हार नसेल,” असे सांगत शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
अयोध्या पर सुप्रीम कोर्ट का जो भी फैसला आएगा, वो किसी की हार-जीत नहीं होगा। देशवासियों से मेरी अपील है कि हम सब की यह प्राथमिकता रहे कि ये फैसला भारत की शांति, एकता और सद्भावना की महान परंपरा को और बल दे।
— Narendra Modi (@narendramodi) November 8, 2019
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ‘देशातील सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की, देशातील शांतता, एकता आणि सद्भावनेच्या महान परंपरेला तडा जाणार नाही. ही आपली प्राथमिकता असणे आवश्यक आहे.” असे आवाहन त्यांनी केले आहे. तीन दशकांपासून अयोध्या रामजन्मभूमी वादामुळे देशात अनेक राजकीय चढउतार झाले. अनेक दशकांनंतर अखेर या प्रकरणावर अंतिम निकाल लागणार आहे. १६ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी झाल्यानंतर किमान तीन आठवडे या प्रकरणाबाबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे गोगोई यांनी स्पष्ट केले होते.
देश की न्यायपालिका के मान-सम्मान को सर्वोपरि रखते हुए समाज के सभी पक्षों ने, सामाजिक-सांस्कृतिक संगठनों ने, सभी पक्षकारों ने बीते दिनों सौहार्दपूर्ण और सकारात्मक वातावरण बनाने के लिए जो प्रयास किए, वे स्वागत योग्य हैं। कोर्ट के निर्णय के बाद भी हम सबको मिलकर सौहार्द बनाए रखना है।
— Narendra Modi (@narendramodi) November 8, 2019
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे ४० दिवस सुनावणी झाल्यानंतर १६ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. या निकालामुळे सर्व राज्यांमध्ये सतर्क राहण्याच्या सूचना आहेत. यानंकालानंतर सोशल मीडियावरून विविध अफवा वा प्रक्षोभक संदेश एकमेकांना पाठवले जाण्याची शक्यता लक्षात घेऊ न सोशल मीडियावर पोलीस लक्ष ठेवून आहे
अयोध्या प्रकरणी पाच सदस्यीय घटनापीठ निकाल देणार
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ आज निकाल देणार आहेत. यात न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांचा समावेश आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण निकालाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.