HW News Marathi
Covid-19

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने पार केला ३५ हजारांचा टप्पा

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. देशात आज (१ मे) कोरोना बाधितांची संख्या ही ३५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत देशात एकूण ३५ हजार ४३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १ हजार १४७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

देशात गेल्या २४ तासांत १ हजार ९९३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर देशात कोरोनामुळे ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशात आतापर्यंत ८ हजार ८८९ लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे, अशी माहिती ही आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे

देशातील वयामानानुसार मृत्यू दर

देशात कोरोनाग्रस्तांचा मत्यूदर हा ३.२ टक्के असून त्यात ६५ टक्के पुरुष आणि ३५ टक्के महिलांचा समावेश आहे. वयोमानानुसार पाहिल्यास वय वर्षे ४५ पेक्षा कमी वयोगटात म़ृत्यूची टक्केवारी १४ टक्के, वयवर्षे ४५ ते ६० दरम्यान ३४.८ टक्के, वयवर्षे ६०च्या पुढे ५१.२ टक्के असा आहे. त्याचप्रमाणे वयवर्षे ६० ते ७५ च्या दरम्यान ४२ टक्के, तर वयवर्षे ७५ त्या पुढे मृत्यूदर हा ९.२ टक्के आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्या ७८ टक्के प्रकरणांमध्ये रुग्णांचे वय जास्त होते आणि त्यांना अन्य आजारही होते, हे लक्षात घेण्याची गरज असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी काल (३० एप्रिल) सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरे यांनी सरकारला आर्थिक घडी सावरण्यासाठी दिला ‘हा’ सल्ला

News Desk

लॉकडाऊन पुन्हा सुरू होणं हे राज्यासह सर्वसामान्य लोकांना पूरक ठरणारं नाही – रोहित पवार  

News Desk

अमेरिका भारताला व्हेंटिलेटर्सची मदत करणार | डोनाल्ड ट्रम्प

News Desk