HW News Marathi
देश / विदेश

#CoronaVirus : देशात रुग्णांचा आकडा १९९ वर, तर राज्यात रुग्णांची संख्या स्थिर

नवी दिल्ली | देशभरात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. देशात सध्या १९८ कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णालयात १७१ वर उपचार सुरू आहे, तर दोन कोरोनाग्रस्तांची प्रकृती गंभीर आहे. देशात २० जण कोरोनाची बाधा झालेल्या ताब्यतीत सुधारणा झाली आहे. तसेच कोरोनाने देशात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात कर्नाटक, दिल्ली, मुंब आणि पंजाब देशातील ४ राज्यात कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

तसेच राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४८ असून १ ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला. यानुसार आता राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४९ वर आहे. आणि राज्यात कोरोनाचाग्रस्तांचा आकडा स्थिर आहे. राज्यात १८ जानेवारी पासून ताप,सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात कालपर्यंत (१९ मार्च) १०३६ जणांना भरती करण्यात आले आहे. कालपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ९७१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करत दिली आहे.

दरम्यान, राज्यात काल ३ कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४८ झाली आहे. नगर जिल्ह्यातील ५१ वर्षीय पुरुष करोना बाधित आढळला असून तो आपल्या पत्नीसह दुबईला गेला होता. त्याची पत्नी करोना निगेटिव्ह आढळली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे.

देशात कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

 

  • महाराष्ट्र – ४९
  • केरळ – २८
  • उत्तर प्रदेश – १९
  • दिल्ली – १७
  • हरियाणा – १७
  • तेलंगाणा – १६
  • कर्नाटक – १५
  • लडाख – ८
  • राजस्थान – ७
  • जम्मू -काश्मीरमधील केंद्रशासित प्रदेश – ४
  • तामिळनाडू – ३
  • उत्तराखंड – ३
  • पंजाब – २
  • आंध्रप्रदेश – २
  • ओडिशा – २
  • गुजरात – 2
  • पश्चिम बंगाल – १
  • पुद्दुचेरी – १
  • चंदीगढमधील केंद्रशासित प्रदेश – १
  • छत्तीसगढ – १

एकूण – १९८ देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या

राज्यात असा आहे कोरोना रुग्णांची संख्या

  • पुणे- १९
  • मुंबई – ९
  • नागपुर – ४
  • यवतमाळ – ३
  • नवी मुंबई – ३
  • कल्याण- ३
  • रायगड – १
  • अहमदनगर – २
  • औरंगाबाद – १
  • रत्नागिरी – १
  • ठाणे – १
  • उल्हासनगर – १

एकूण – ४८ कोरोनाग्रस्तांची संख्या

कोरोनामुळे आतापर्यंत देशात कुठे किती मृत्यू?

  • कर्नाटक – ७६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू (१) – ११ मार्च
  • दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (१) – १३ मार्च
  • मुंबई – ६४ वर्षीय वृद्धाचा मृत्यू (१) – १७ मार्च
  • पंजाब – ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू (१) – १९ मार्च

एकूण – ४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शताब्दी एक्स्प्रेसची बोगी जळून खाक,सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले 

News Desk

पाकिस्तानातून निघालेली समझौता एक्स्प्रेस आज अटारीत दाखल

News Desk

माझ्या ‘फडणवीस’ असण्यामुळे शरद पवारांनीही भूमिका बदलल्या !

News Desk