HW News Marathi
देश / विदेश

बॅंकांच्या दोन दिवसीय संपामुळे होणार एटीएममध्ये खडखडाट

नवी दिल्ली | महिना अखेरीस बँकांच्या दोन दिवसीय संपामुळे पगारी कर्मचाऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. ३० व ३१ मे रोजी रोजी बँकांनी पुकारलेल्या संपामुळे एटीएममध्येही पैशांचा तुटवडा भासण्याची चिन्हे आहेत.

देशभरातील बॅंकांनी उच्च वेतनासाठी बुधवार ३० मे आणि गुरुवार ३१ मे रोजी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. सलग दोन दिवस बँकांचे कामकाज बंद राहिल्यास एटीएमवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. महिन्याचा शेवटचा दिवस ‘पगाराचा’ असल्यामुळे नागरीकांना पैसे काढताना अडचणी येण्याची शक्यता आहे.

‘युनायटेड युनियन फोरम ऑफ बँक युनियन’ (यूएफबीयू)ने हा संप पुकारला आहे. यामध्ये या संपात नऊ संघटनांचा समावेश आहे. इंडियन बँक असोसिएशनने प्रस्ताव दिलेल्या २ टक्के इतक्या नाममात्र पगारवाढीचा निषेध म्हणून संपाची हाक देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील फोर्ट भागात असलेल्या स्टेट बँकेच्या मुख्य शाखेसमोर काही बँक कर्मचारी निदर्शने देखील करणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus : बिहारमध्ये एकाचा मृत्यू, तर देशात ‘कोरोना’ बळींची संख्या ६ वर

swarit

मनमोहन सिंग यांच्या काळापासून फोन टॅपिंग सुरु, फडणवीसांचा दावा

News Desk

कर्तव्यपथावरील संचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या १४ विद्यार्थ्यांचा सराव

Aprna