नवी दिल्ली | एएन-३२ विमानाचे अवशेष अरुणाचल प्रदेशमधील लिपोमध्ये सापडले आहे. भारतीय हवाई दलाचे एएन-३२ विमान ३ जूनपासून बेपत्ता होते. गेल्या आठ दिवसापासून या विमानाचा शोध घेतला जात होता. एएन हे मालवाहू विमान आसाममधील जोरहाट विमानतळावरून दुपारी १२.२५ वाजल्यापासून संपर्क तुटल होता. या विमानात ५ प्रवासी ८ क्रू मेंबर्स असे एकूण १३ प्रवासांना घेऊन विमान अरुणाचल प्रदेशातील मेचुका येथे जाणार होते.
Efforts are now continuing to establish the status of occupants & establish survivors. Further details will be communicated as the recovery actions progress.
— Indian Air Force (@IAF_MCC) June 11, 2019
हवाई दलाने विमानाचा शोध घेण्यासाठी सुखोई ३० आणि सी १३० ही विमाने शोधमोहीमेसाठी रवाना केली आहेत. दरम्यान, विमान जात असलेले ठिकाण मेचुका अॅडव्हान्सड लँडिंग ग्राऊंड हे चीन सीमेच्याजवळ आहे. ऐवढेत नव्हे तर या विमानाची माहिती देणार्याला पाच लाख रुपयांच्या बक्षिस देण्यात येणार असल्याची घोषणा हवाई दलाकडून करण्यात आली होती. या विमानाचा शोध घेण्यासाठी हवाई दलाने सर्व उपलब्ध यंत्रणा कामाला लावल्या होत्या. अखेर या विमानाचे अवशेष सापडले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.