June 26, 2019
HW Marathi
देश / विदेश

काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन ऑल-आऊट’सारखा कोणताही प्रकार नाही !

श्रीनगर | जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज (१४ जानेवारी) एक मोठे विधान केले आहे. काश्मीरमध्ये ऑपरेशन ऑल-आऊटसारखा कोणताही प्रकार नाही. माध्यमांकडून चुकीच्या संकल्पनेचा वापर केला जात आहे. “केवळ दहशतवाद्यांकडून भारतीय सैन्यावर गोळीबार केला गेल्यानंतर प्रत्युत्तर दिले जाते. त्यांच्याकडून कोणतेही ऑपरेशन ऑल-आऊट सुरु नाही”, असे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

“आमची तर इच्छा आहे की आतंकवादाच्या मार्गाने जाणाऱ्या तरुणांनी योग्य रस्त्यावर यावे. यासाठी आम्ही जे करू शकतो ते सर्व काही प्रयत्न करत आहोत”, असेही मलिक यावेळी म्हणाले. फारुख अब्दुल्ला यांच्यावर टीका करताना मलिक म्हणाले कि, “फारुख एक वरिष्ठ नेते आहेत. परंतु, ते प्रत्येक वेळी वेगवेगळी विधाने करतात. हे चुकीचे आहे.”

Related posts

आता ड्राईव्हिंग लायसन्सलाही लागणार “आधार”

News Desk

घरगुती वापरातील गॅस महागला  

News Desk

शबरीमाला निर्णयाच्या निषेधार्थ केरळ बंद

अपर्णा गोतपागर