जिनिव्हा | जगात कोरोना या महामारीने मानवाचे सुरळीत चालले जनजीवन विस्कळित करून टाकले आहे. या महामारी विषयी जागतिक आरोग्य संघटनेने एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. WHO प्रमुख टेड्रोस एडहोम घेबियस यांनी असे सांगितले आहे की, पुन्हा आधीचे सुरळीत जीवन आपल्या सगळ्यांना जगता येणे अशक्य आहे.या महामारीच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केलं तर, परिस्थिती आणखी बिघडू शकते याबाबत सर्वांनाच सावध करत ते म्हणाले, ‘कित्येक देशांमध्ये परिस्थिती अतिशय चुकीच्या दिशेनं पुढं जात आहे. त्यामुळे हा विषाणू लोकांच्या जीवाला धोका निर्माण करत आहे. मूळ निर्देशांचं पालन न केलं गेल्यास या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळणार आहे’, असे त्यांनी म्हटले.
मात्र, आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम केले तर या कोविड १९ या महामारी विरोधात आपण एकत्र लढू शकतो. यासाठी आपल्याला ३ महत्वाच्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. पहिली महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शक्य तितके कमी करणे गरजचे आहे. आणि या विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्याची नितांत गरज आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे लोकांना सशक्त बनवणे गरजेचे आहे.. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारचे पाठबळ गरजेचे आहे. तसेच, आरोग्य विभागाकडून सर्व ती मदत मिळणे ही गरजेचे आहे.
जर या सर्व बाबी मिळाल्या तर आपण नक्कीच कोरोनाविरुद्ध लढू शकतो आणि जिंकू शकतो आणि आपण जिंकणारच असा विश्वास टेड्रोस यांनी व्यक्त केला आहे. सुरुवातीला आपण या महामारीचा सामना करण्यासाठी तयार नव्हतो, मात्र नंतर आपण सर्व त्या बाबी अवलंबल्या आणि कोरोनाला आळा कसा घालता येईल यासाठी प्रयत्न केले. आताही आपण एकत्र येऊन विज्ञानाला गती देऊ शकतो. आणि कोरोनाविरुद्ध उपाय शोधू शकतो. विज्ञान, उपाययोजना आणि एकता याचा समन्वय साधून आपण कोरोनावर मात करू शकू असा विश्वास त्यांनी दिला आहे.
There will be no return to the “old normal” for the foreseeable future. But there is a roadmap to a situation where we can control #COVID19 and get on with our lives. No matter where a country is in its epidemic curve, it is never too late to take decisive action. https://t.co/qz4s8KWsYV pic.twitter.com/qxd3tsgAuf
— Tedros Adhanom Ghebreyesus (@DrTedros) July 14, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.