HW Marathi
Covid-19 देश / विदेश राजकारण

देशातील ‘या’ राज्याने ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला लॉकडाऊन    

नवी दिल्ली | देशातील कोरोनाचा संसर्ग अद्यापही आटोक्यात आलेला नाही. मात्र, देशाचे रखडलेले आर्थिकचक्र लक्षात घेता अडीच ते ३ महिन्यांच्या लॉकडाऊननंतर अखेर अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाचा सातत्याने वाढत जाणारा प्रादुर्भाव लक्षात घेता पश्चिम बंगाल राज्यात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्टपर्यंत आठवड्यातील २ दिवस लॉकडाऊन कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. ममता बॅनर्जी यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

ऑगस्ट महिन्यापासून पश्चिम बंगालमध्ये आठवड्यातील २ दिवस कडक लॉकडाऊन असेल. म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये २, ५, ८, ९, १६, १७, २३, २४ आणि ३१ ऑगस्ट रोजी संपूर्ण लॉकडाऊन असेल अशी माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. या लॉकडाउनदरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये, त्याचप्रमाणे सार्वजनिक आणि खासगी वाहतूक बंद राहतील. तर पेट्रोल पंप, शेतीविषयक मालवाहतूक, न्यायालये अशा काही गोष्टी सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Related posts

सांगली जिल्हयातील ग्रामीण भागातील एका लहान शेतकरी कुटुंबात डॉ. पतंगरावांचा जन्म

News Desk

#LokSabhaElections2019 : भाजपने उमेदवारी दिली तर माढ्यातून लढणार !

News Desk

कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या वॉरियर्सना भारतीय सैन्यदलाकडून विमानातून पुष्पवृष्टी करत मानवंदना

News Desk