HW News Marathi
देश / विदेश

लष्कराच्या कारवाईत काश्मिरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तीन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.ऑपरेशन हलनकुंड च्या अंतर्गत कुलगामसह तीन भागांमध्ये ही कारवाई करण्यात आली. १४ नोव्हेंबरपासून ऑपरेशन हलनकुंड सुरु असल्याची माहिती जम्मू काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी पत्रकार परिषदेत दिली. पकडण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी जखमी असुन त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. येणाऱ्या काळातही ऑपरेशन हलनकुंड सुरु राहणार अशी माहीती सुरक्षा दलांकडून देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधानांकडून मराठीमधून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

News Desk

केरळच्या पूरग्रस्तांना युएईनेकडून देण्यात येणारी ७०० कोटीची मदत अफवा

News Desk

२९ वस्तूवरील जीएसटी हटवली

swarit