HW Marathi
देश / विदेश

चिमुकलीच्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेऊन पेटवला

मेरठ। मिलक गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तीन वर्षांची मुलगी फटाक्यांमुळे गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मुलाने चिमुकलीच्या तोंडामध्ये सुतळी बॉम्ब ठेवला आणि तो पेटवला. तो बॉम्ब तोंडात फुटल्याने मुलगी गंभीर जखमी झाली आहे. यानंतर तिला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

पोलिस आरोपीचा शोध घेत असून पिडीत मुलीचे वडील शशी कुमार यांनी तक्रार केली असे सांगण्यात येत आहे आहे. पीडित मुलगी घराबाहेर खेळत असताना हरपालने तिच्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेवला आणि पेटवला. मुलीला तब्बल ५० टाके पडले आणि घशालाही इजा झाली आहे.

Related posts

नागालँडमध्ये भाजप आणि एनडीपीपी युतीचा विजय

News Desk

आगीत दहा जणांचा मृत्यू

News Desk

भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाने केला तरुणीचा पाठलाग

News Desk