HW News Marathi
देश / विदेश

आधार क्रमांकाद्वारे पॅन क्रमांक मिळवणे होणार शक्य

नवी दिल्ली | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर करताना अनेक नव्या तरतूदी आणि योजना सादर केल्या. त्यातीलच एक महत्त्वाची बाब म्हणजे जर आधारकार्डच् क्रमांक असल्यास पॅन क्रमांक तात्काळ मिळू शकेल अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच आधाक क्रमांक असल्यास पॅन क्रमांक ऑनलाइन पद्धतीने मिळण्यास मदत होणार आहे, असेही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.

आयकर कायद्यानुसार जर कोणत्याही व्यक्तीला इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करायचा असेल तर आधार क्रमांकाचा उल्लेख करणे गरजेचे आहे. शिवाय ३१ मार्च २०२० पर्यंत पॅन आणि आधार क्रमांक जोडणी करणे बंधनकारक आहे. इतकेच नाही तर बँक खाते उघडणे आणि आर्थिक देवाण-घेवाणीकरीताही पॅन कार्ड आवश्यक आहे. येणाऱ्या वर्षात करदात्यांची ‘आधार’द्वारे पडताळणीही सुरू करण्यात येणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना स्पष्ट केले. करदात्यांना सोयीस्कर व्हावे यासाठी लवकरच नवी यंत्रणाही सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. ‘आधार’द्वारे तात्काळ ऑनलाइन पॅन क्रमांक देण्यात येणार असून त्यासाठी कोणताही अर्ज भरण्याची गरज भासणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चुकीची माहिती दिल्याने मुख्यमंत्र्यांसह सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरेंच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची फेरपडताळणी ?

News Desk

भाजप शुक्राचार्याप्रमाणे सरकारने घेतलेल्या निर्णयात अडथळे आणते, मात्र…!

News Desk

“तुमची लेकरं परदेशात शाळेत अन आमची कायम ऊसाच्या फडात”, पंकजा मुंडेंची पोस्ट व्हायरल

News Desk