HW News Marathi
देश / विदेश

आजपर्यंत भारताने कधीही प्रथम अण्वस्त्रांचा वापर केलेला नाही, पण आता…!

नवी दिल्ली | “आजपर्यंत भारताने कधीही प्रथम अण्वस्त्रांचा वापर केलेला नाही. परंतु, भविष्यात काय घडेल ते त्या त्या परिस्थितीवर अवलंबून आहे”, असे सूचक विधान केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर पाकिस्तानकडून भारताविरोधात कुरघोड्यांना सुरुवात झाली आहे. या निर्णयानंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये एक प्रकारची तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानकडून सुरु असलेल्या कुरघोड्यांच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला हा सूचक इशारा दिला आहे.

राजनाथ सिंह हे पोखरण येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात बोलत होते. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार भारताविरोधात कारवाया सुरूच आहेत. इतकेच नव्हे तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी “आम्ही युद्धास तयार आहोत”, असेही विधान केले होते. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी इम्रान खान यांनी पुन्हा आपल्या त्याच विधानाचा पुनरुच्चार करत भारतावर अनेक आरोप देखील केले. या संपूर्ण पार्श्वभूमीवर भारताच्या अण्वस्त्रांचा वापराबाबत राजनाथ सिंह यांनी हे विधान करत नाव न घेता पाकिस्तानला इशारा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नीरव मोदीची रद्द पासपोर्टवर परदेशवारी

swarit

केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार? – जयंत पाटील

News Desk

बसला अपघात, आयटीबीपीच्या एका जवानाचा मृत्यू

News Desk