हैदराबाद | कोरोनामुळे सर्व धार्मिक स्थळे बंद होती. आणि आता जवळपास ८० दिवसांनंतर आज (8 जून) देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान अशी ख्याती असलेले तिरुपती बालाजी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. ८ आणि ९ जून या दोन दिवसात मंदिराचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनाच दर्शन घेता येणार आहे. यासाठी त्यांनाही ऑनलाईन टाईम स्लॉट बुक करावा लागणार आहे. १० जून रोजी मंदिर कर्मचाऱ्यांसह स्थानिक भाविक दर्शनासाठी मंदिरात जाऊ शकतात. तर ११ जूनपासून संध्याकाळी साडेसातपर्यंत देशाच्या इतर भागातून येणाऱ्या भाविकांना बालाजीचं दर्शन घेता येणार आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १० वर्षांखालील मुलांना आणि ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांना दर्शनाची परवानगी नाही, असे तिरुमाला तिरुपती देवस्थानम् ट्रस्टने स्पष्ट केले आहे. मंदिर खुले झाले असले तरी सध्या फक्त भगवान तिरुपतीचेच दर्शन होणार आहे. परिसरातील इतर मंदिरं आणि स्वामी पुष्करिणीमध्ये लोकांना प्रवेश करता येणार नाही.
Andhra Pradesh: Devotees visit Tirupati Balaji Temple as the Government allows reopening of places of worship from today. 'Darsanam' has been allowed for Tirumala Tirupati Devasthanams (TTD) employees & locals for the first three days. It will be open for all from 11th June. pic.twitter.com/1hrM3fvHOW
— ANI (@ANI) June 8, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.