मुंबई | देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव जेवढा लवकर आटोक्यात आणता होईल. तितक्याच लवकर देशाच्यी अर्थव्यवस्था रुळावर येईल. त्यामुळे कोरोनाला लवकरत लवकर आळा घालणे गरजेचे आहे. “सध्या नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क न लावण्याचा विचारही करू नये. सुरक्षित अंतर, हात धुणे आणि सॅनिटायझर्सचा वापर अत्यंत गरजेचा आहे,’ अशा सूचना विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. कोरोना आणि अनलॉक १.० या पार्श्वभूमीवर मोदींनी देशातील २१ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज (१६ जून) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाध साधताना म्हणाले.
To even think of stepping out without a mask or face cover is not right at present. ‘Do gaj ki doori’, hand-washing & use of sanitisers is of utmost importance. With markets opening&people stepping out, these precautions are even more important: PM Narendra Modi. #COVID19 pic.twitter.com/49byyJgllW
— ANI (@ANI) June 16, 2020
दरम्यान, मोदींनी अनलॉक-१ होऊनही दोन आठवडे उलटले असून यानंतर राज्याला आलेले अनुभव आणि आता सध्याची राज्यातील कोरोनाची परिस्थिती यासंदरभात मोदींनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. तसेच देशात कोरोनाच्या प्रादुर्भावाला जितक्या लवकर आटोक्यात आणता येईल. तितक्या लवकर देशातील अर्थव्यवस्था सुरळीत होईल. कोरोनाला लवकर रोखले तर बाजार, कार्यालये आणि वाहतुकीची साधने सुरु करता येतील, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
देशात कोरोनाच्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण जवळपास ५० टक्के आहे. आमच्यासाठी एकाही भारतीयाचा मृत्यू दुर्दैवी बाब असून मात्र, जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात मृत्यूदर खूपच कमी आहे. मात्र, सध्या नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क न लावण्याचा विचारही करू नये. सुरक्षित अंतर, हात धुणे आणि सॅनिटायझर्सचा वापर अत्यंत गरजेचा आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.