नवी दिल्ली। लग्न समारंभात ५० पेक्षा अधिक नागरिकांच्या एकत्र येण्यावर मनाई आहे. लग्न समारंभातही सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन आवश्यक आहे. अंत्यसंस्कारावेळीही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. अंत्यविधीला २० पेक्षा अधिक नागरिक सहभागी होऊ शकत नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (५ मे) सांगितले.
To maintain social distancing, gathering of not more than 50 persons are allowed at wedding functions and not more than 20 persons at last rites of deceased persons: Punya Salila Srivastava, Joint Secretary, Ministry of Home Affairs (MHA) #COVID19 pic.twitter.com/S2VnxxxZRv
— ANI (@ANI) May 5, 2020
देशात गेल्या २४ तासात देशभरात कोरोनाचे ३,९०० नवे रुग्ण सापडले असून, १९५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशभरात आतापर्यंत ४६ हजार, ४३३ कोरोना रुग्णांची संख्या आहे. तक१, ०२० जण कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले.
Total number of #COVID19 positive cases in India rises to 46,711 including 31,967 active cases, 1,583 deaths, 13,160 cured/discharged and 1 migrated: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/xbeWihMr6H
— ANI (@ANI) May 5, 2020
तसेच कोरोनामुळे आतापर्यंत १ हजार ५५८ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू होण्याचे हे सर्वाधिक प्रमाण आहे, असे त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले.खासगी ऑफिसेस किंवा संस्थांच्या कार्यालयांमध्ये थर्मल स्कॅनिंग, मास्क, हॅण्डवॉश आणि सॅनिटायजर आवश्यक आहे. कार्यालयांमध्ये आणि कंपन्यांच्या बसेसमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही पालन करणे आवश्यक आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.