HW News Marathi
देश / विदेश महाराष्ट्र

राज्याच्या सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू; कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद

मुंबई | राज्यातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज सुनावणीचा दुसरा दिवस आहे. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (21 फेब्रुवारी) ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी युक्तीवाद केला होता. सर्वोच्च न्यायालयात आज (22 फेब्रुवारी) होणाऱ्या सुनावणीत देखील कपिल सिब्बल यांचाय युक्तीवाद सुरू झाला आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या व्हिपप्रमाणे आमदारांवर कारवाई झाली असती तर  आताचे सरकार पडले असते, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला होता. आणि कपिल सिब्बल यांनी केलेला हा युक्तीवाद घटनापीठाने मान्य केला. परंतु, वेळ मागे कशी घेणार, असा सवाल पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने केला. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा युक्तीवाद होणार आहे.

 

दरम्यान, शिंदे गटाने 10 व्या सूचीचे उल्लंघन केलेले आहे.  त्यामुळे विलनीकरण हाच पर्याय शिंदे गटाकडे उपलब्ध आहे. या मुद्द्यावर कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद केला. ठाकरे गटाचे दुसरे वकील मनु सिंघवी हे आज सर्वोच्च न्यायालयात करणार आहेत. मनु सिंघवी हे राज्यपालांच्या भूमिवकेवर युक्तीवाद करणार असल्याची माहिती मिळाली आहे. कपिल सिब्बल यांचे युक्तीवाद हा 10 वी अनुसूची आणि विधानसभा अध्यक्ष युक्तीवाद करणार, मनु सिंघवी हे राज्यपालांची भूमिका यावर युक्तीवाद करणार असून यानंतर देवदत्त कामत हे ठाकरे गटाचे तिसरे वकिल आहेत. ते देखील सर्वोच्च न्यायालयात आज होणाऱ्या सुनावणीत युक्तीवाद करणार आहेत.

 

सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज आज 3 वाजून 25 मिनिटापर्यंतच सुरू असणार आहे.  यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात 941 पानाची याचिका दाखल केलेली आहे. यात ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर वेगवेगळे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयात दोन स्वतंत्र बेंच यावर काम करणार आहेत. यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयाचे मत काय येणार असल्यामुळे आजचा दिवस महत्वाचा मानला जातो.

Related posts

प्रवीण दरेकरांना दिलासा, सोमवारपर्यंत अटक न करण्याचे सत्र न्यायालयाचे निर्देश

Aprna

कर्ज मंजूरीसाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे केली शरीरसुखाची मागणी

News Desk

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मार्केटमध्ये हापूस दाखल

swarit