मुंबई। देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पण, दुसऱ्या बाजूला देशात रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत आहे म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट वाढून ४९.२१ वर पोहोचला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज (११जून) पत्रकार परिषदेत दिली आहे. जगात कोरोनामुळे झालेल्या देशांमध्ये भारतातील मृत्यूदर सर्वात कमी मृत्यूदर ठरलाय, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक प्रो. बलराम भार्गव यांनी दिली आहे.
Today, our recovery rate is 49.21%. The number of patients recovered presently exceeds the number of active patients: Lav Agrawal, Joint Secretary, Health Ministry on COVID19 situation in the country pic.twitter.com/klM7AuiZaj
— ANI (@ANI) June 11, 2020
देशातील ८३ जिल्ह्यांमध्ये एक सर्व्हे राबवण्यात आला असून या सर्व्हेसाठी २८,५९५ घरांचा दौरा करण्यात आला आहे. तसेच देशातील ८३ जिल्ह्यातील २६,४०० लोकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले, अशी माहिती केंद्र आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
या सर्व्हेच्या अहवालानुसार, लॉकडाऊन यशस्वी होत असताना दिसून येतोय. अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर खूपच कमी आहे, असेही त्यांनी सांगितले. तरीही मास्क वापरणे, हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन कायम केले पाहिजे, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
दरम्यान, देशातील कोरोना रुग्णांची संख्या २ लाख ८६ हजार ५७९ वर पोहोचली आहे. तर देशात सध्या १ लाख ३७ हजार ४४८ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत ८१०२ जणांनी आपले प्राण गमवावे लागलेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.