HW News Marathi
देश / विदेश

गोव्याच्या मंत्रीमंडळाची आज पुनर्रचना, ४ नव्या मंत्र्यांना मिळणार ‘ही’ जबाबदारी

पणजी | गोव्यामध्ये काँग्रेस पक्षातील १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल आहे. यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी (१ जुलै) गोवा फॉरवर्डच्या उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई, जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर, गृहनिर्माणमंत्री जयेश साळगावकर आणि अपक्ष महसूलमंत्री रोहन खंवटे यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले आहेत. गोव्यात मंत्रीमंडळाची पुर्नरजना होणास असून यात जुन्या ४ मंत्र्यांच्या जागी नव्या ४ मंत्र्यांची नियुक्ती होणार आहे.

गोव्यात आज सायंकाळी ४ वाजता प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारची पुनर्रचना होत आहे. पणजीत आज (१३ जुलै) संध्याकाळी ४ वाजता होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या व भाजपमध्ये रुजू झालेल्या १० पैकी ३ आणि भाजपच्या मायकल लोबो यांना मंत्रिपद दिले जाईल. बाबू कवळेकर हे उपमुख्यमंत्री असतील. त्यांना नगर नियोजन व कृषी ही विजय सरदेसाई यांच्याकडील खाती दिली जातील. बाबूश मोन्सेरात यांना महसूल व आयटी ही खाती दिली जातील तर फिलीप नेरी यांना जलस्रोत व वनखाते ही दोन खाती दिली जातील. मायकल लोबो यांना बंदर कप्तान, गृहनिर्माण व नव्यानेच स्थापन होणाऱ्या घन कचरा व्यवस्थापन स्वच्छ भारत मिशन हे खाते दिले जाणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टीएमसीच्या मंत्री, आमदारांना अटक, ममतादीदी म्हणाल्या, मलाही अटक करा

News Desk

काँग्रेसला नक्की काय करायचंय आणि दिशा कोणती याबाबत संभ्रम, राऊतांचा काँग्रेसशी ‘सामना’!

News Desk

चांद्रयान-२ चंद्राच्या अधिक जवळ, ऑर्बिटरपासून वेगळा झाला विक्रम लँडर

News Desk