HW News Marathi
देश / विदेश

मुंबई-गोवा क्रुझची आज पहिली सफर

मुंबई | मुंबई पोर्ट येथे देशातील पहिल्या आंतरदेशीय क्रुझची आज पहिली सफर सुरू होणार आहे. ही सफर ऐतिहासीक मानली जात आहे. या सफरमध्ये प्रवाशांना अनेक सुविधा मिळणार आहेत. आरामदायी समुद्री प्रवास म्हणून याकडे पाहिले जाते. यामुळे मुंबईला जागतिक पर्यटन यादीत मोठे स्थान मिळेल, मुंबई जागतिक पर्यटनाचे केंद्र म्हणून पुढे येईल अशी आशा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. तसेच देशात क्रूझ वाहतुकीला चालना देण्यासाठी आणखी सहा टर्मिनल उभारण्यात येतील अशी घोषणा केली. या क्रूजचे तिकीट ४,५०० ते १२,५०० पर्यंत असणार आहे.

ही आहेत मुंबई- गोवा क्रूझची वैशिष्ट्ये

– १.७५ हेक्टर क्षेत्र.

– ४ लाख स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले असेल.

– या क्रूझमध्ये पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा.

– प्रति वर्षी सात लाख प्रवाशांच्या सुविधेसाठी रिसेप्शन, चेक-इन, इमिग्रेशन आणि सुरक्षा व्यवस्था.

– सर्व ३६५ दिवसांकरिता उपहारगृहे, भोजन कक्ष आणि रिटेल आऊटलेट्स नागरिकांसाठी उपलब्ध.

– एकाच वेळी ५००० प्रवाशी या टर्मिनलमधून ये-जा करू शकतात.

– क्रूझमुळे देशाला आर्थिक वृद्धीसोबत रोजगार उपलब्ध होतील.

– सोयीस्कर पार्किंग आणि सामान हाताळणी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

UP Elections 2022 : काँग्रेसकडून उमदेवारांची पहिली यादी जाहीर; उन्नाव बलात्कार पीडितेच्या आई उमेदवारी

Aprna

दहशतवाद्यांनी केले काश्मीरमधील पोलिसांच्या नातेवाईकांचे अपहरण

swarit

नेपाळी तरुणीला झाडावर बांधून चार तास बलात्कार

News Desk