टोक्यो | टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला अजून एक पदक निश्चित झालं आहे. भारताची युवा बॉक्सिंगपटू लवलिना बोर्गोहेनने दोन दिवसांपूर्वी कारकीर्दीतील पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची किमया साधली होती. शुक्रवारी महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील रोमहर्षक उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत लवलिनाने चायनीज तैपईची माजी जगज्जेती निन-चीनवर सरशी साधत मात केली आहे. लव्हलिनाने निन-चीनवर ४-१ ने मात करत ऑलिम्पिकमध्ये भारताचं पदक निश्चित केलं आहे.
#TokyoOlympics | Boxing, Women's Welterweight (64-69kg), Quarterfinal 2: Lovlina Borgohain beats Chinese Taipei's Chin-Chen Nien 4-1, assured of a medal pic.twitter.com/gxKKQkZee0
— ANI (@ANI) July 30, 2021
बॉक्सिंगमध्ये उपांत्य फेरी गाठली की पदकाची खात्री होते. लव्हलिनाची उपांत्य फेरीत २०१९ च्या विश्वविजेत्या टर्कीच्या अॅना लिसेन्कोशी लढत होईल. लव्हलिना ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी भारताची दुसरी भारतीय महिला बॉक्सर बनली आहे. त्याच्या आधी मेरी कोमने लंडन ऑलिम्पिकमध्ये २०१२ मध्ये कांस्यपदक जिंकले होते. बॉक्सिंगमध्ये पुरुष आणि महिला दोघांमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी लवलिना तिसरी भारतीय आहे. पुरुषांमध्ये विजेंदर सिंगने २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.