नवी दिल्ली | सर्जिकल स्ट्राइकचा मोठ्या प्रमाणावर गवगवा करण्यात आला, असे मत लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) डी.एस. हुड्डा यांनी व्यक्त केले आहे. सर्जिकल स्ट्राईकबाबत करण्यात आलेल्या अती प्रचाराविषयी हुड्डा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सैन्याच्या कोणत्याही मोहिमेचे असे राजकारण करणे योग्य नाही, असेही पुढे हुड्डा यांनी म्हटले आहे. ‘रोल ऑफ क्रॉस-बॉर्डर ऑपरेशन्स अँड सर्जिकल स्ट्राइक’ या विषयावर हुड्डा बोलत होते.
General (retired) D S Hooda: I do think there was too much hype over it (surgical strike). The strike was important & we had to do it. Now how much should it have been politicised, whether it was right or wrong is something that should be asked to the politicians. (7.12) pic.twitter.com/8v0QJ1tzK5
— ANI (@ANI) December 8, 2018
भारतीय लष्कराने २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाकिस्तानने व्यापलेल्या काश्मीरमध्ये आतंकवाद्यांविरोधात सर्जिकल स्ट्राइक केले होते. या कारवाईच्या वेळेस डी.एस.हुड्डा उत्तरी सैन्य विभागाचे कमांडर होते. आतंकवाद्यांचे अनेक मनसुबे मोडीत काढण्याचे या सर्जिकल स्ट्राइकचे उद्दिष्ट्य होते.
तसेच हुड्डा पुढे म्हणाले कि, “मी सैन्याच्या दृष्टिकोनातून या प्रकरणाकडे पाहतो. सर्जिकल स्ट्राईक महत्त्वाचा होता. उरीमध्ये आमचे अनेक जवान मारले गेले होते. त्यामुळे पाकिस्तानला समज देणे आवश्यकच होते. परंतु, याचा मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला ज्याची आवश्यकता नव्हती. त्याचप्रमाणे या प्रकरणाला राजकीय रंग देण्यात आला.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.