मुंबई | देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात तब्बल ६ हजार ८८ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत एका दिवसात आढळलेल्या कोरोनाबाधितांची ही देशातील सर्वाधिक संख्या आहे. तर २४ तासांत १४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे या २४ तासांत देशभरात ३ हजार २३४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे देशभरात कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा ४८ हजार ५३४ वर पोहोचला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता १ लाख १८ हजार ४४७ झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ३ हजार ५८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Total number of #COVID19 cases in the country now at 118447, including 66330 active cases and 3583 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/DVXxJL5Udf
— ANI (@ANI) May 22, 2020
दरम्यान, महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट २८.१५ टक्के आहे. तर राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४१ हजार ६४२ वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत १ हजार ४५४ जण मृत्यूमुखी पडले आहेत. यापैकी मुंबईत २५ हजार ५०० कोरोनाबाधित सापडले आहेत त्यातील ८८२ जणांचा बळी गेले आहेत. महाराष्ट्राखालोखाल तामिळनाडूनमध्येही कोरोना संख्या चिंताजनक वेगाने वाढत आहे. येथे काल (२२ मे) दिवसभरात ७७६ नवे रुग्ण आढळल्याने येथील कोरोना रुग्णांची संख्या १३ हजार ९६७ वर पोहोलची आहे. तर गुजरातमध्ये कोरोनाचे १२ हजार ९०५ आणि दिल्लीमध्ये ११ हजार ६५९ रुग्ण झाले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.