नवी दिल्ली | देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४० हजार २६३ वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशात १ हजार ३०६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे २ हजार ४८७ नवीन रुग्ण आढळले असून ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात रुग्णांच्या संख्येचा वेग आता काहीसा कमी झाल्याची दिलासादायक बातमी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.
2487 new #COVID19 positive cases, 83 deaths reported in the last 24 hours: Ministry of Health and Family Welfare https://t.co/rx1r2lyxEe
— ANI (@ANI) May 3, 2020
कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी या आधी १०.५ दिवस लागत होते. मात्र हा दर १२ दिवसांवर आला आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी १२ दिवस लागतात, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.देशात कालपर्यंत (२ मे) १० लाख कोरोना चाचणी केल्या आहेत. प्रत्येक दिवसात जवळपास ७४ हजार टेस्ट केला जात असून देशातील ३१९ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, ही एक समाधानकारक आहे.
Today more than 10,000 COVID19 patients have been discharged. Those still admitted at hospitals are on the road to recovery. If in last 14 days doubling rate was 10.5 days, then today it's around 12 days.Our mortality rate of 3.2% is the lowest in the world: Union Health Minister pic.twitter.com/YnQpnJ9IeJ
— ANI (@ANI) May 3, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.