HW News Marathi
देश / विदेश

घर, दुकानांमधून जाते रेल्वेगाडी! video

हनोई : व्हिएतनामची हनोई येथे रेल्वे ट्रॅक अगदी घर आणि दुकानांच्या मधून जातो. काही ठिकाणी तर ट्रॅक घरांच्या इतका जवळ आहे की, प्रत्येक वेळी गाडी जाण्यासाठी घराचे दार लावावे लागते. तसेच काही ठिकाणी बाजारही चक्क ट्रॅकवर लागतो आणि गाडी आल्यावर तो सारखा उचलावा लागतो.

लॉन्ग बीन ब्रिजकडे जाणारा हा मार्ग जुन्या शहराच्या निमुळत्या गल्ल्यांमधून जातो. हनोई शहराचा हा सर्वांत जुना भाग असून ते महत्त्वाचे आर्थिक केंद्र आहे. सरकारी आदेशांमुळे येथे आतापर्यंत उंच इमारती नाही बनू शकल्या. त्यामुळे वस्ती ट्रॅकपर्यंत परसत गेली. त्यामुळे ट्रेन येते तेव्हाच लोक तिला जागा करून देतात, त्यानंतर पुन्हा आपापल्या कामी लागतात. सुरुवातीला लोकांना हा प्रकार फारच भयानक वाटायचा, परंतु आता आम्हाला या गोष्टी अंगवळणी पडल्याचे स्थानिक सांगतात.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ती सेक्स सीडी बनावट, हार्दिकचे भाजपवर आरोप

News Desk

केंद्र सरकारकडून कृषीसह लघु-मध्यम उद्योगांना दुसरे आर्थिक पॅकेज मिळू शकते ?

News Desk

भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांनो छत्रपतींची बदनामी तुम्हांला मान्य ? राऊतांचा सवाल ..

Arati More