HW News Marathi
देश / विदेश

तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत सादर होणार

नवी दिल्ली | केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद आज (१३ फेब्रुवारी) राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक सादर करतील. यापूर्वी तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत पारित झाले असून आता हे विधेयक राज्यसभेत सादर केले जाईल. या विधेयकावरून राज्यसभेत विरोधकांकडून मोठा गदारोळ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत पारित होणे थोडे कठीण असल्याची चिन्हे दिसत आहेत. मुस्लिम महिला (विवाह अधिकार संरक्षण) २०१८ विधेयक सेलेक्ट कमिटीला पाठविण्यात यावे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ट्राय’च्या नव्या नियमाविरोधात केबल व्यावसायिकांचा आक्रमक पवित्रा

News Desk

बिहारमध्ये नक्षलवाद्यांचा उन्माद, भररस्त्यात ४ वाहने पेटवली

News Desk

सीबीआय संचालकांना रातोरात का हटवले? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

News Desk