त्रिपूरा | देशात कोरोनाबाधितांचा आकडा हा २१ हजारांच्याही पुढे गेला आहे. कोरोनापासून कशी लवकरात लवकर सूटका होईल यासाठी राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत. एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा जरी वाढत असला तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. महाराष्ट्रातही काही जिल्ह कोरोना ा होऊमुक्त झाले आहे. तर, देशातही अनेक राज्य ही हळूहळू कोरोनामुक्त होत आहेत. कोरोनाच्या लढाईत गोवा, अरुणाचल प्रदेश, आणि मणिपूर या ३ राज्यांनी यशस्वी मात केली आहे. या रांगेत आता त्रिपुरा राज्याचाही समावेश झाला आहे. त्रिपुरा कोरोनामुक्त झाल्याची घोषणा मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी केली आहे.
त्रिपुरात कोरोनाचे २ पॉझिटिव्ह रुग्ण आझळून आले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचाराअंती त्यांचा आका कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्रिपुरा कोरोनामुक्त झाल्याचे ट्विट देब यांनी केले आहे. पण खबरदारी म्हणून नागरिकांना घरी राहण्याचे आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
📌UPDATE!
The Second corona patient of Tripura has been found NEGATIVE after
consecutive tests.Hence our State has become Corona free.
I request everyone to maintain Social distancing and follow Government guidelines.
Stay Home Stay Safe.
Update at 08:20 PM, 23th April
— Biplab Kumar Deb (@BjpBiplab) April 23, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.