HW News Marathi
देश / विदेश

माझा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न – प्रवीण तोगडिया

अहमदाबाद – विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी माझा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न केला आहे असे आरोप मोदींवर केला आहे . तोगडिया हे सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून गायब झाले होते. अहमदाबादमध्ये मध्य रात्रीच्या सुमारास बेशुद्ध अवस्थेत सापडले होते. त्यानंतर त्यांना शाहीबाग परिसरातील चंद्रमणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

‘जुन्या खटल्यांचा हवाला देऊन माझा एन्काऊंटर करण्याचा कट रचला असून मी याला घाबरणार नाही. गेली काही दिवसापासून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात होता. पण, मी हिंदूसाठी नेहमीच आवाज उठवणार असल्याचे प्रवीण तोगडिया यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते’

तोगडिया हे सोमवारी सुरक्षेशिवाय घरातून बाहेर पडले होते. अहमदाबाद मधील कोटरपूर भागातील पार्कमध्ये एका व्यक्तीला प्रवीण तोगडिया बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यांनी रुग्णवाहिनीला कॉल करून बोलवण्यात आले असून रात्री ९ वाजताच्या सुमारास तोगडिया यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोगडिया यांच्या शरीरातील साखरचे प्रामाण कमी झाल्यामुळे ते बेशुद्ध झाल्याचे चंद्रमणी रुग्णालयातील डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील जत तालुक्यातील दुष्काळी भागात कर्नाटकाने पाणी सोडून डिवचले

Aprna

एससी-एसटी कायद्यातील दुरुस्तीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

News Desk

NewYear2019 : गुगलने दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा

News Desk