जकार्ता | इंडोनेशियात त्सुनामीचा कहर पाहायला मिळाला आहे. या भयंकर त्सुनामीमध्ये जवळपास १६८ जणांच्या मृत्यूची नोंद झाला असून ६०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर समुद्राच्या आत भूस्लखन होऊन त्सुनामीमध्ये आल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान त्सुनामीची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. क्रॅकाटो या बेटाची ज्वालामुखीच्या उद्रेक्रातून निर्मिती झाली आहे. याच ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होऊन समुद्राच्या तळाशी भूस्लखन झाल्यान त्याचे रुपांतर मोठ्या त्सुनामीमध्ये झाले. सन १८८३ मध्ये झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून या बेटाची निर्मिती झाली होती.
Evakuasi korban tsunami di Selat Sunda terus dilakukan oleh tim gabungan. Jumlah korban terus bertambah. Hingga 23/12/2018 pukul 10.00 WIB tercatat 62 orang meninggal dunia, 584 orang luka & 20 orang hilang. Ratusan rumah dan bangunan rusak. Alat berat dikerahkan untuk evakuasi. pic.twitter.com/DYUbxGzPmw
— Sutopo Purwo Nugroho (@Sutopo_PN) December 23, 2018
इंडोनेशियातील भूवैज्ञानिकांनी या त्सुनामीच्या कारणांचा शोध सुरू केला आहे. समुद्राच्या भरतीचा काळ आणि समुद्राच्या तळाशी झालेले भूस्लखन यामुळे त्सुनामी आली असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. सुंदा सामुद्रधुनी जावा आणि सुमात्रा या दोन बेटांच्या बरोबर मध्यभागी आहे. याच ठिकाणी अनाक क्रॅकाटो हे छोटसे बेट आहे. याच ठिकाणी त्सुनामी आली. या भागातील भूगर्भामध्ये मोठ्या हालचाली होत असतात. त्यामुळे इंडोनेशियात भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्याचमुळे या भागाला ‘पॅसिफिक रिंग ऑफ फायर’ असे संबोधले जाते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.