नवी दिल्ली | नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्यावरुन देशभरातील राजकीय वातावरण तापले असतानाच ट्विटरवरही लेखक चेतन भगत आणि माजी केंद्रिय मंत्री अनंत हेगडे यांच्यात ट्विट वॉर सुरु आहे. हिंदू-मुस्लीम या मुद्द्यावरुन वाद घालत सध्या अर्थव्यवस्थेकडे सक्ष द्या असा टोला चेतन भगत यांनी सरकारला मारला आहे. हिंदू-मुस्लीम यांच्यातील वाद या वर्षानुवर्षांचा आहे तर त्याला काही काळ बाजूला ठेवा आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष दिले तर आपण २०४० सालापर्यंत जीडीपीमध्ये १० हजार डॉलर प्रति कॅपिटाच्या हिशोबाने पोहोचू शकू या आशयाचे ट्विट चेतन भगत यांनी केले आहे.
If we can just brush the Hindu-Muslim issues aside for next 20 years, and focus on growing the economy, we can easily reach $10,000 per capita GDP by 2040.
Then we can fight all we want.
But my guess is, when incomes reach that level, we won't fight like this.
— Chetan Bhagat (@chetan_bhagat) January 14, 2020
दरम्यान, त्यांच्या या ट्विटला माजी केंद्रिय मंत्री अनंत हेगडे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “जे या हिंदू-मुस्लीम वादाला बाजूला ठेवण्यास सांगत आहेत तेच फक्त एका देवावर विश्वास ठेवतात आणि बाकीच्यांना काफीर मानतात. आम्ही विकासाचा अजेंडा पुढे नेत आहोत, मात्र काही लोक जिहाद वाढवत आहेत”. अश्या खोचक शब्दांत हेगडेंनी उत्तर दिले.
The grand proposer of this concept needs to convince the other side which believes in one God & the rest as infidels.
We are pushing the developmental model on the economic front while the other end is hobnobbing with global jihad!@chetan_bhagat is living in fool's paradise! https://t.co/eg6zPUUkSp
— Anantkumar Hegde (@AnantkumarH) January 15, 2020
याआधी या दोघांनीही अनेक वादग्रस्त ट्विट्स केले आहेत आणि थेट केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे. दरम्यान, केंद्र सरकारचे ४० हजार कोटी वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते असा आरोपही हेगडे यांनी केला होता. पण भाजपाकडे बहुमत नसताना देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यामागे काही कारणं होती असा दावाही अनंत हेगडे यांनी केला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.