HW Marathi
देश / विदेश राजकारण

नरेंद्र मोदी हे प्रत्यक्षात ‘सरेंडर मोदी’ | राहुल गांधी

मुंबई | लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले.  या मुद्दयावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहे. नरेंद्र मोदी हे प्रत्यक्षात सरेंडर मोदी आहेत, अशी बोचरी टीका राहुल गांधींनी आज (२१ जून)  ट्वीटकरून केली आहे. आणि राहुल गांधींनी भारताचेचीनबरोबरचे सध्याची धोरण शांततेचे आहे, असे शिर्षक असलेला जपान टाइम्सचा एक लेख ट्वीट केला आहे.

भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काल (२० जून) पंतप्रधानांची सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीनंतर, पंतप्रधानांनी “चिनी सैन्य भारतीय हद्दीत शिरलेच नाही”, असा दावा केला. “चीनच्या आक्रमकतेमुळे पंतप्रधानांनी भारतीय भूभाग चीनच्या हवाली केला. जर तो भूभाग चीनचा होता तर मग भारतीय जवानांना का मारण्यात आले ? कुठे मारण्यात आले”, असे सवाल राहुल गांधींनी उपस्थित केले. राहुल गांधींनी काही प्रश्न उपस्थित केले.दरम्यान, राहुल गांधींच्या प्रश्नांना आता गृहमंत्री अमित शहांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ट्विटमध्ये अमित शहांनी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या एका जवानाच्या वडिलांचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात या प्रकरणाचे राजकारण कोणीही करून नये, असे आवाहन एका शहीद जवानांच्या वडिलांनी केले आहे. अमित शाह आपल्या ट्विटमध्ये म्हणतात कि, “एका शूर जवानाच्या वडिलांनी या व्हिडिओत स्पष्ट शब्दात संदेश दिला आहे. आजच्या संपूर्ण देश एकत्र आला आहे. अशा कठीण स्थितीत राहुल गाणी क्षुल्लक कारणांवरून राजकारण करू नये. या अशा प्रकारच्या राजकारणातून बाहेर यायला हवे. राष्ट्रहितासाठी एकत्रितपणे, एकसंघ होऊन उभे राहायला हवे”, असे ट्विट अमित शहांनी केले आहे.

संबंधित बातम्या

क्षुल्लक गोष्टींचे राजकारण नको, अमित शहांनी राहुल गांधींना सुनावले 

Related posts

आज वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त बैठक !

News Desk

Union Budget 2021 |  भारतात पहिल्यांदाच डिजीटल जनगणना केली जाणार

News Desk

दिग्विजय सिंह यांची मुलगी श्रेयसी सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk