HW News Marathi
देश / विदेश

शोपियानमधील चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर | जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये शुक्रवारी (३ मे) भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. तर १ जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या जवानाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच या चकमकीला सुरुवात झाली. भारतीय सुरक्षा दलाला या परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर या परिसरात घेराव घालण्यात आला असून सध्या या परिसरात शोधमोहीम सुरु आहे.

सीमा भागात पाकिस्तानकडून होणाऱ्या कुरापतींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यात एक भारतीय जवान मात्र जखमी झाला आहे. शोपियानमधील या चकमकीनंतर या परिसरातील इंटरनेट सेवा ही काही कालावधीसाठी बंद करण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुगलकडून सर डॉन ब्रॅडमन यांना डुडलद्वारे आदरांजली

Gauri Tilekar

पीएनबीच्या घोटाळ्यातील आरोपींना अटक

News Desk

मालदीवने पंतप्रधान मोदींना ‘निशान इज्जुद्दीन’ सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले

News Desk